Home Uncategorized जलसंधारण दिनानिमित्त 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’

जलसंधारण दिनानिमित्त 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’

18 second read
0
0
5

no images were found

जलसंधारण दिनानिमित्त 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’

 कोल्हापूर,  : मृद व जलसंधारण विभागामार्फत जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत मृद व जलसंधारणाबाबत युवा पिढीमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून 21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सकाळी 6.30 वाजता ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनचे उद्घाटन व ‘Reel for Soil and Water Conservation’ Instagram Reel स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन स्पर्धा समाप्तीनंतर वारणा भवन, ताराबाई पार्क येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

     कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार सर्वश्री शाहू छत्रपती, धनंजय महाडीक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडीक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थितत राहणार आहेत.

     दरम्यान, 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी 15 ते 21 ऑगस्टदरम्यान राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ Instagram Reel स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी या माध्यमातून मृद व जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा व जास्तीत जास्त नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल पवार यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ     मुंबई, कल्याण, रायगड, प…