Home सामाजिक मुंबई पोलीसमध्ये निवडीबद्दल डोंगळे यांचे कुलगुरूंकडून अभिनंदन

मुंबई पोलीसमध्ये निवडीबद्दल डोंगळे यांचे कुलगुरूंकडून अभिनंदन

0 second read
0
0
105

no images were found

मुंबई पोलीसमध्ये निवडीबद्दल डोंगळे यांचे कुलगुरूंकडून अभिनंदन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुरक्षा रक्षक विश्वनाथ पांडुरंग डोंगळे यांची मुंबई पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विश्वनाथ डोंगळे हे माजी सैनिक असून ३४ मराठा फिल्ड रेजिमेंटमध्ये १७ वर्षे कार्यरत होते. देशसेवा बजावून परतल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून ४ वर्षांपासून कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची मुंबई पोलिस भरतीमध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ‘शिवचरित्र’ भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पुढील कारकीर्दीसाठी कुलगुरूंनी डोंगळे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले आणि उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …