
no images were found
दिशा सालियानाच्या मृत्यूदिवशी आजोबांचे निधन झाल्याने हॉस्पिटलमध्ये होतो : आदित्य ठाकरे
नागपूर : दिशा सालियाना हिचा मृत्यू झाला त्याच दिवशी माझ्या आजोबांचे निधन झाले होते. आजोबांचे निधन झाल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यामुळे त्यांना जे काढायचे ते काढू द्या, असे म्हणत प्रथमच त्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित असण्याबाबत आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं.
हिवाळी अधिवेशनादरम्यान, दिशा सालियाना मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिशा सालियाना मृत्यूवरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच या सर्वांवर मौन सोडत तिच्या मृत्यूदिवशी हॉस्पिटलमध्ये का होते? याचा खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार घेतले जात आहे. विशेषतः राणे कुटुंबीयांंकडून त्यांच्यावर यावरून वारंवार निशाणा साधण्यात येत होता.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत याबाबतचे भाष्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यावरून गेली दोन दिवसांपासून गदारोळ माजला आहे. विधानसभेत गुरुवारी त्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांना काय काढायचे ते काढू द्या. पण एका ३२ वर्षाच्या युवकाला हे खोके सरकार घाबरले आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावर बसणार आहोत, असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.