
no images were found
मतदान कसं वाढलं? याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं खरं कारण
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२ टक्के मतदान कसे झाले? असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित केला जात आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शेवटच्या तासात मतदानाचा टक्का कसा वाढला? यावर महाराष्ट्र निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भाष्य केले आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता महायुतीमधील पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत. मविआचे घटक पक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व अपक्षांनीही निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. विशेष करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले होते. मग रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२ टक्के मतदान कसे झाले? असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहेत. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.