
no images were found
सानिया मिर्झा देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार
पुणे : मिर्झापूर येथील एका टीव्ही मेकॅनिकच्या मुलीची डिफेंस अॅकॅडमीच्या (एनडीए) परीक्षेत निवड झाली आहे. सानिया मिर्झा असे तीचे नाव असून महिलांसाठी राखीव असलेल्या १९ जागांपैकी फ्लाइंग विंगमध्ये तिला दुसरे स्थान मिळाले आहे. सानिया मिर्झा आता लवकरच फायटर पायलट बनणार आहे. सानिया मिर्झा एनडीए मधून उत्तीर्ण होऊन देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे.
मिर्झापूरच्या कोतवाली क्षेत्रातील जसोवरमध्ये राहाणाऱ्या एका टीव्ही मेकॅनिकची सानिया मिर्झा ही मुलगी आहे. तिच्या वडिलांचे नाव शाहिद अली असे आहे. सानियाने तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण पंडित चिंतामणि दुबे इंटर कॉलेजमधून पूर्ण केले आहे. तीने इयत्ता १२ वी मध्ये देखील जिल्ह्यात टॉप केलं. सानियाने १० एप्रिल २०२२ रोजी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या यादीतही तिचे नाव आहे. ती २७ डिसेंबर रोजी खडकवासला, पुणे येथील एनडीए अॅकॅडमीमध्ये सामील होणार आहे.
सानियाने लहानपणापासूनच हवाई दलात भरती होण्याचे आणि फायटर पायलट बनण्याचे स्वप्न पाहिले होते. बारावीच्या शिक्षणानंतर तिने यासाठी कोचिंगही केले. तिचे कष्ठ अखेर फळाला आले. तिच्या या कामगिरीचा तिच्या आई-वडिलांशिवाय संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे.