
no images were found
सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य अॅड. राम आपटे यांचे निधन
बेळगाव: येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड राम महादेव आपटे (वय ९७) यांचे आज दि. २३ रोजी सकाळी राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. काही महिन्यापासून ते आजारी होते. देहदान केल्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
१९२६ साली जन्मलेले अॅयड. राम आपटे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनले होते. सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कामगारांच्या पाठीशी त्यांनी कायद्याची ताकत उभी केली होती. वयाच्या ९० वर्षानंतर त्याच तळमळीने ते काम करत होते.