no images were found
खराब होण्यापूर्वी दिवाळी शिधाचे वाटप करा : नीलम गोऱ्हे
नागपूर : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दिवाळी सणानिमित्त फूड किटचे वाटप करण्यात आले, मात्र अजूनही अनेक ठिकाणी फूड किट वितरित झालेले नाहीत. सदरचा शिधा गोडावूनमध्ये खराब होण्यापूर्वी त्याचे लवकरात लवकर वाटप करावे अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.
राज्य सरकारतर्फे दिवाळीत शिधा म्हणून ‘दिवाळी फूड किट’चे वाटप करण्यात आले होते. या संदर्भातली निविदा प्रक्रिया आणि सदोष वितरण याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ. मनीषा कायंदे आणि ॲड. अनिल परब यांनी शुक्रवारी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले, परंतू सदस्यांचे या उत्तरावर समाधान झाले नाही, त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला निर्देश दिले की, शिधा वाटपातील त्रुटी दूर कराव्यात आणि शिधा किट खराब होण्यापूर्वी त्याचे वितरण करावे.