no images were found
नियोजन समितीच्या सभेचे 24 डिसेंबर रोजी आयोजन
कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव संजय शिंदे यांनी दिली.
या बैठकीत दि. 10 जानेवारी 2022 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना माहे मार्च 2022 अखेरच्या खर्चास मान्यता देणे, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2021-22 कोविड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाय योजना करण्यासाठी मान्यता दिलेल्या कामांना व पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 माहे नोव्हेंबर 2022 अखेरील खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मधील पुनर्विनियोजनास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देणे व आयत्यावेळचे विषय, असे विषय होणार आहेत. तरी सर्व संबंधितांनी या सभेस विहित वेळेत उपस्थित रहावे, असेही श्री. शिंदे यांनी कळविले आहे.