no images were found
शिवाजी विद्यापीठात बुधवारी अस्लम सईद यांचे पर्यावरण फोटोग्राफीवर व्याख्यान
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात उद्या चेन्नई फोटो बिनालेचे विभागीय समन्वयक तथा पर्यावरण फोटोग्राफर अस्लम सईद (मुंबई) यांचे पर्यावरण फोटोग्राफी या विषयावर व्याख्यान आणि सादरीकरण आयोजित केले आहे. हा उपक्रम पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या नवीन इमारतीमध्ये बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत होईल, अशी माहिती अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.
चेन्नई फोटो बिनाले ही फोटोग्राफर यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना आहे. या संघटनेकडून छोट्या शहरातील फोटोग्राफरसाठी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या फोटोग्राफरला 50 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाते. या स्पर्धेची तपशीलवार माहिती अस्लम सईद देणार आहेत.
सईद हे पर्यावरण विषयक फोटोग्राफी करतात. याशिवाय मुंबई आणि परिसरातील नद्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी डॉक्युमेंटेशन केले आहे. विविध विद्यापीठातील पर्यावरण पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. सईद यांच्या व्याख्यानाला तसेच सादरीकरणाला विद्यार्थी, माध्यमातील फोटोग्राफर आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.