no images were found
सिटी इंडिया आणि एनसीपीए सहयोगाने युवा संगीतकारांना हिंदुस्तानी संगीतासाठी देणार शिष्यवृत्ती
द नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) आणि सिटी इंडिया यांनी सहयोगाने हिंदुस्तानी संगीतामध्ये (गायन – खयाल/ध्रुपद, तालवाद्य – तबला/पखवाज) प्रगत शिक्षण देण्याच्या उद्देशाने वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. अर्जदारांना अॅडव्हान्स्ड ट्रेनिंगमधील या शिष्यवृत्तीसाठी 10 जानेवारी २०२३ पूर्वी आपले नाव नोंदविता येईल. तसेच ही एक वर्षासाठी (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४) प्रति महिना १०,०००/- रु. आहे.
भारतीय आणि पाश्चात्य अभिजात संगीताच्या क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सिटी इंडिया आणि एनसीपीए यांनी सतत सहयोगाने काम केले आहे. एनसीपीए सर्व स्तरांवर कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी अथक मेहनत घेते, तसेच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आवश्यक ज्ञान व संसाधने मिळण्याची खात्री घेते. हा कार्यक्रम तरुण प्रतिभावान संगीतकार आणि होतकरू कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान करणारा उपक्रम आहे.
परफॉर्मिंग आर्टस् – पात्रता निकष आणि सर्वसाधारण सूचना: * उमेदवाराचा बायो-डेटा हाच शिष्यवृत्तीसाठी त्याचा/तिचा अर्ज म्हणून विचारात घेतला जाईल. त्यासाठी कोणताही स्वतंत्र फॉर्म भरण्याची गरज नाही. • वयोमर्यादा – ख्याल आणि तालवाद्ये – १८ ते ३० वर्षे (१ मार्च २०२३ पर्यंत) ध्रुपद – १८ ते ३५ वर्षे (१ मार्च २०२३ पर्यंत ) · एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात संगीताच्या क्षेत्रातील इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/अनुदानाचे लाभार्थी असलेले उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाहीत. · कोणत्याही कंपनीमध्ये पूर्णवेळ/अर्धवेळ कर्मचारी असलेल्या उमेदवारांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू नये. · ऑल इंडिया रेडिओच्या ‘ए’ ग्रेड कलाकारांसह कोणतेही व्यावसायिक संगीतकार या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाहीत. · कुरिअरद्वारे पाठविण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. केवळ वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर प्राप्त झालेले अर्जच विचारात घेतले जातील. · केवळ भारतीय नागरीक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. · 10 जानेवारी २०२३ नंतर मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. · एनसीपीएच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. संपर्कासाठी फोन: ९३२४३६०५२० (सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०)
सिटी-एनसीपीए परफॉर्मिंग आर्टस् शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा:
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने आपले अर्ज (सांगितिक शिक्षणाविषयीचा बायो-डेटा) ईमेलद्वारे ncpascholarships@gmail.com या पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे. अर्जामध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर/पर्यायी कॉन्टॅक्ट नंबर, व्यावसायिक पात्रता, ईमेल आयडी, संगीत शिक्षक/गुरु, एकूण किती वर्षे प्रशिक्षण घेतले आहे याची माहिती तसेच आपली संपादने/बक्षिसे/शिष्यवृत्ती आणि कार्यक्रम इत्यादी विशेषत्वाने नोंदविण्याजोगे तपशील असले पाहिजेत. कृपया अर्जासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती, सांगितिक कार्यक्रमांच्या व्हिडिओ क्लिप्स पाठवू नयेत. सर्व तपशीलांची सूची असलेला बायो-डेटा पुरेसा ठरेल. शॉर्टलिस्ट केल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना ईमेल किंवा टेलिफोनवरून कळवण्यात येईल.
शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांची निवड कशाप्रकारे होईल? – फेब्रुवारी २०२३ मध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या निवडक उमेदवारांची व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे ऑडिशन घेतली जाईल. एनसीपीएच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. अधिक माहितीसाठी कृपया एनसीपीएची वेबसाइट https://ncpamumbai.com/ येथे भेट द्या.