Home सामाजिक ‘किसानदिना’निमित्त जीवनातील शेतकर्‍्यांच्या महत्त्वावर ‘झी टीव्ही’च्या कलाकारांनी व्यक्त केले आपले विचार!

‘किसानदिना’निमित्त जीवनातील शेतकर्‍्यांच्या महत्त्वावर ‘झी टीव्ही’च्या कलाकारांनी व्यक्त केले आपले विचार!

25 second read
0
0
46

no images were found

‘किसानदिना’निमित्त जीवनातील शेतकर्‍्यांच्या महत्त्वावर ‘झी टीव्ही’च्या कलाकारांनी व्यक्त केले आपले विचार!

प्रत्येक नागरिकाच्या जीवनात शेतकर्‍्यांच्या योगदानाच्या महत्त्वाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी भारतात 23 डिसेंबर हा दिवस ‘शेतकरीदिन’ म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनानिमित्त शेतकर्‍्यांचे महत्त्व आणि त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, त्याबाबत ‘झी टीव्ही’वरील ‘रब से है दुआ’मधील अदिती शर्मा, ‘कुमकुम भाग्य’मधील कुशाग्र नौटियाल, ‘मीत’मधील रणदीप राय आणि ‘कुंडली भाग्य’मधील मनित जौरा या कलाकारांनी आपले विचार व्यक्त केले.

‘रब से है दुआ’मध्ये दुआची भूमिका साकारणारी अदिती शर्मा म्हणाली, “माझ्या मते आपल्या देशातील शेतकर्‍्यांना महत्त्व देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. रोज जगण्यासाठी आपल्याला लागणार्‍्या अन्नासाठी आपण शेतकर्‍्यांवर अवलंबून असतो. आपण जे अन्न खातो, ते निर्माण करण्यासाठी शेतकर्‍्यांना किती परिश्रम करावे लागतात, हे आजच्या पिढीला कळणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्याला लागणारा भाजीपाला आणि धान्य ही नेहमी थेट शेतकर्‍्यांकडून विकत घेतला पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांच्या पिकाचं खरं दाम मिळेल. जीवनातील ही मूलभूत गरज भागविण्यासाठी शेतकरी जे काबाडकष्ट करतात, त्याबद्दल मी त्यांची कायमची ऋणी राहीन.”

‘मीत’मध्ये अनुरागची भूमिका रंगविणारा रणदीप राय म्हणाला, “आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अतिशय मोलाची भूमिका पार पाडणार्‍्या शेतकर्‍्यांचा सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी शेतकरीदिन साजरा केला जातो. माजी दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी भारतातील कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांसाठी त्यांचं योगदानाचं महत्त्व साजरं करण्यासाठी भारतात हा दिवस साजरा केला जातो. शेतकरी हे भारताचे खरे मजबूत आधारस्तंभ असून ते शेतात करीत असलेल्या कष्टांमुळे आज आपण रोज अन्नाचे दोन घास खाऊ शकतो. त्यामुळे आपण त्यांचे नेहमी आभारी राहायला हवे. या दिवशी प्रत्येकाने शेतकर्‍्यांबाबत सहानुभूतीची भूमिका घ्यावी आणि आपल्यासाठी ते घेत असलेल्या कष्टाचं स्मरण करावं, असं मला वाटतं.”

‘कुमकुम भाग्य’मध्ये सिध्दार्थची भूमिका साकारणारा कुशाग्र नौटियाल म्हणाला, “आपल्या जीवनात शेतकर्‍्यांची भूमिका अत्यावश्यक आहे, ही गोष्ट आपण सर्वजण जाणतो आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतकरीदिन साजरा करणं ही आपल्यासाठी महत्त्वाचीच गोष्ट आहे. मी जेव्हा मित्रांबरोबर हॉटेलमध्ये खाण्यासाठी जातो, तेव्हा आमच्या हातून अन्नाची नासाडी होऊ नये, याची मी दक्षता घेतो. आम्हाला जर आम्ही मागविलेलं अन्न संपविता आलं नाही, तर आम्ही ते सोबत बांधून घेतो आणि नंतर ते गरजू व्यक्तीला देतो. शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की आपल्याला पुरेसं अन्न उपलब्ध करण्यासाठी शेतकरी हे आपला आत्मा आणि मन शेतात घालतात. त्यामुळे इतके कष्ट करून पिकविलेलं अन्न फुकट जाऊ नये, याची खबरदारी आपण प्रत्येकानेच घेतली पाहिजे. आपण निदान इतकं तरी करू शकतो ना?”

‘कुंडली भाग्य’मध्ये ऋषभची भूमिका रंगविणारामनित जौरा म्हणाला, “चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन भारतात राष्ट्रीय शेतकरीदिन म्हणून साजरा केला जातो. प्रमुख शेतकरी नेते असलेल्या चरणसिंह यांनी देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं आणि समाजातील दुबळ्या गटाला सशक्त बनविण्यासाठी काम केलं. या दिनानिमित्त मी देशातील सर्व शेतकर्‍्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आपल्यासाठी अन्नधान्य पिकविण्यासाठी ते जे कष्ट घेतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी जेव्हा लहान होतो, तेव्हा मी मदर इंडिया चित्रपट पाहिला होता. मला त्या चित्रपटाची कथा फार भावूक वाटली. त्यात एका महिला शेतकर्‍्याला किती कष्ट सोसावे लागतात, ते पाहून मी मनातून हललो होतो. धान्याचा प्रत्येक कण किती महत्त्वाचा आहे, ते मला जाणवलं. त्या चित्रपटातील मला आवडणारं एक गाणं म्हणजे ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा’. कठीण काळात टिकून राहण्यासाठी एक ना दुसर्‍्या अर्थाने प्रत्येकासाठी हे गाणं एक प्रेरणा देतं.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…