no images were found
‘बायोमेडिकल सायन्सेसमध्ये करिअरच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये जीवरसायनशास्त्र आणि सेंट्रल प्लेसमंेट सेल, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ”बायोमेडिकल सायन्सेसमध्ये करिअरच्या संधी” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेमध्ये बायोमेडीकल सायन्सेस मधील संशोधक विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीबाबत विशेष मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.निशांत व्यास, हेड ऑफ लाईफ सायन्स प्रा.लिमिटेड, पुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस डॉ.के.डी.सोनवणे, अधिविभागप्रमुख, कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तसेच डॉ.पी.के.पवार, यांनी डॉ.डी.टी.शिर्के, .कुलगुरू, यांच्या प्रशासकीय आणि संशोधनातील प्रदीर्घ कार्याबाबत माहिती दिली. कार्यशाळेच्या संयोजिका डॉ.श्रीमती पी.डी.दांडगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व कार्यशाळा व फ्लो सायटोमेट्रीचे महत्त्व विशद केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष .डॉ.डी.टी.शिर्के मा.कुलगुरू यांनी कार्यशाळेसंदर्भातील .फ्लो सायटोमेट्री हे उपकरण वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप उपयुक्त उपकरण आहे, असे सांगितले. तसेच सदर उपकरणचा वापर हा निरोगी व रोगी पेशी मधील बदल ओळखण्यासाठी करता येतो. यातून रोगाचे योग्य निदान अचूक होते. असे उपकरण जीवरसायनशास्त्र अधिविभागामध्ये विद्यापीठाच्या डीएसटी-फिस्टच्या योजनंतर्गत खरेदी केेलेले आहे. बायोलॉजीक व मेडीसीन यांचे महत्व दिवसंेदिवस वाढत चालले आहे. तसेच विद्यार्थ्यानीं ‘अनुभवातून शिक्षण’ घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ.श्रीमती पी.डी.दांडगे यांनी आभारप्रदर्शन केेले. कु आरती कुलकर्णी आणि निशा नेर्लेकर या पीएचडी संशोधक विद्यार्थीनीनी सूत्रसंचालन केले. श्रीमती सीमा बुवा सहा.अधीक्षक यांनी कार्यशाळेचे व्यवस्थापन केले. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सेंट्रल प्लेसमंेट सेलचे समन्वयक प्रा.जी.एस.राशीनकर, रसायनशास्त्र अधिविभाग यांचे आर्थिक साहाय्य तसेच अमूल्य सहकार्य लाभले.
या कार्यशाळेस डॉ.पी.एम.गुरव, प्र.अधिविभागप्रमुख, सूक्ष्मजीवरसायनशास्त्र, श्री एस.एस.काळे, सहा.प्राध्यापक, श्री श्री शैलेश वाघमारे, श्री नईम नदाफ सहा.प्राध्यापक उपस्थित होते. त्याचबरोबर श्रीमती नदाफ सल्मा,,प्रज्ञा मोहिते, एेश्वर्या वाघमारे, प्रज्ञा पाटील, प्रफुल्ल दांडगे, सुरज खोत, सुबोध कांबळे, अंबिका दोंड, हर्षद बोटे, समीधा काकडे, समृध्दी काकडे, विक्रम मोरे, हर्षद कांबळे, कपिल शिंदे इत्यादी जीवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सुक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे पीएचडी संशोधक विद्यार्थी आणि कार्यशाळेच्या उद्धाटनप्रसंगी जीवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सुक्ष्मजीवशास्त्र, अधिविभागातील एम.एस्सीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.