Home मनोरंजन आयर्विन ख्रिश्चन मैदानावर आलेली अंडर वॉटर टनेल एक्स्पो आता केवळ ३ जून पर्यंतच कोल्हापूरकरांनी भेट देण्याचे आवाहन

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर आलेली अंडर वॉटर टनेल एक्स्पो आता केवळ ३ जून पर्यंतच कोल्हापूरकरांनी भेट देण्याचे आवाहन

0 second read
0
0
19

no images were found

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर आलेली अंडर वॉटर टनेल एक्स्पो आता केवळ ३ जून पर्यंतच कोल्हापूरकरांनी भेट देण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील आयर्विन ख्रिश्चन मैदानावर आलाय पाण्याखालील माशांचा बोगदा म्हणजेच अंडर वॉटर टनेल एक्स्पो
याअंतर्गत विविध प्रकारचे मासे पाहण्यास मिळत आहेत माशांचा विविध जाती आणि लहाणांसह मोठ्यांना देखील याठिकाणी धमाल मस्ती आणि मनोरंजन याठिकाणी होत आहे तरी ३ जून पर्यंतच चालणाऱ्या या नगरीस भेट देण्याचे संयोजकांनी आवाहन केले आहे.
रेड गोल्ड फिश,ऑस्कर, सिल्व्हर गोल्ड, ब्लॅक गोल्ड, फिराना, टँटरा,लेझर, शार्क,कोईकर, अँलीगेटर, आरफामा आदी माशांच्या प्रजाती याठिकाणी पाहण्यास मिळत आहेत.
केरळ येथील तज्ञ या सर्व माशांची काळजी असून. याठिकाणी उभा करण्यात आलेला माशांचा हा बोगदा साधारण ८० फूट रुंद व २०० फूट लांब असा उभारलेला आहे. सर्वांच्याच मनोरंजनासाठी विविध आकर्षक खेळ आणि खाद्य व पेय यांची दुकाने आहेत. खरेदीसाठीही विविध दुकाने असून मनोरंजन नगरीचा आनंद घेऊ शकतो. परदेशी खेळसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मेरी गो राउंड, फिरता मनोरा, लहान मुलांची आगगाडी, लहान मुलांसाठीचे पाळणे, जपानी पाळणा त्यालाच ‘त्सुनामी पाळणा’ असे सुद्धा म्हणतात. या सर्व मनोरंजनांची वेळ सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत आहे.तरी कोल्हापूरकरांनी या मनोरंजन नगरीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्यांदाचं वातानुकूलित पाण्याखालील बोगद्यामध्ये मासे बसवण्यात आले असून दुबईचा फिल कोल्हापूरच्या मातीत दिसून येत आहे.या सुट्टीत कोल्हापूरच्या बाळगोपाळासाठी आयर्विन ख्रिश्चन मैदानावर पाण्याखालचा बोगदा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी धमाल मज्जा आणि आनंद घेता येणार आहे. येथे परदेशी खेळ आणि बरंच काही अनुभवता येणार आहे. पाच वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश असून तेथे गेल्यानंतर कोल्हापूर नव्हे तर दुबईचा फिल येतो, असे एक्सपोचे मॅनेजर यांनी सांगितले आहे.
संपूर्ण जगातील विविध प्रकारच्या जिवंत माशांचे प्रदर्शन कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच सुरू केले आहे. दुबई शहराप्रमाणेच कोल्हापूर शहरात वातानुकूलित पाण्याखालील बोगदा तयार केला आहे. कोल्हापूरच्या मातीत मुलांच्या भेटीला आयर्विन ख्रिश्चन मैदानात एक्स्पो आला आहे. या एक्स्पोमध्ये जगभरातील विविध जातींच्या रंगीत जिवंत माशांच्या अनेक प्रजाती आपल्या कोल्हापूर शहरात पाहण्यास मिळत आहेत.तरी ३ जून पर्यंत सुरू राहणाऱ्या या अंडर वॉटर टनेल एक्सपो कोल्हापूरकरांना अवश्य पहावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यासाठी राहुल इस्लाम, शाहिद बारगीर, एजेस पटेल, महेश चक्रवर्ती आदी परिश्रम घेत आहेत

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…