no images were found
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत आपल्या भावंडांचा ताबा मिळवण्यासाठी, आपण सक्षम पालक असल्याचे सिद्ध करण्याचा कैरीचा प्रयत्न
सोनी सबवर अलीकडेच सुरू झलेली ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ ही मालिका त्यातील लोभस व्यक्तिरेखा आणि नव्या प्रकारच्या कथानकामुळे लगेच लोकांची आवडती झाली आहे. मालिकेची नायिका कैरी शर्मा (आशी सिंह) एक होतकरू वकील आहे आणि खूप परिश्रमानंतर स्वतःसाठी आणि आपल्या भावंडांसाठी एक स्थिर भविष्य निर्माण करण्याची धडपड करत आहे. पण तिला सतत आयुष्यात धक्के मिळत असतात. कैरीच्या प्रवासात युग (शब्बीर अहलूवालिया)ची मोठी भूमिका आहे. युग एक हुशार आणि गंभीर प्रकृतीचा वकील आहे. त्याचा एक भूतकाळ आहे, ज्यातून त्याचे व्यक्तिमत्व घडले आहे. त्यामुळे या दोघांचा संबंध तितकाच गुंतागुंतीचा आणि तरीही आकर्षक आहे.
आगामी भागांमध्ये, कैरीला मनाविरुद्ध युगच्या हाताखाली इंटर्न म्हणून काम करावे लागणार आहे. त्यांच्यात इतका तणाव असल्यामुळे त्याच्या हाताखाली काम करण्याबाबत कैरी साशंक आहे. या नाजुक परिस्थितीतून मार्ग काढत असतानाच तिला ज्याची भीती वाटत असते, ते घडते. त्यांना सोडून गेलेले तिचे वडील कुंदन (मधुवेंद्र झा) परत येतात आणि तिच्या लहान भावंडांचा ताबा मिळवण्यासाठी दावा करतात. आपल्या भावंडांचे भवितव्य असे अधांतरी असताना, आपण त्यांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम आणि विश्वास ठेवण्याजोगे पालक आहोत हे कैरीला सिद्ध करावे लागेल. याच वादळात युगचा जुना शत्रू विकी मल्होत्रा (रजत दहिया) देखील अचानक परततो. विकी कैरीला नोकरी आणि नवी सुरुवात करण्याची संधी देऊ करतो. तिने ही नोकरी स्वीकारली तर तिची स्वतःची केस कोर्टात सबळ होणार आहे. युगचा अनियमित पण मनापासून मिळणारा आधार आणि विकीकडून आलेला सुरक्षित नोकरीचा प्रस्ताव यापैकी काय स्वीकारावे या संभ्रमात कैरी आहे. तिने सुरक्षित मार्ग स्वीकारावा की आपल्या मनाचे ऐकावे?
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरीची भूमिका करणारी आशी सिंह म्हणते, “आपल्या वडिलांशी आपल्या भावंडांच्या ताब्यासाठीचा लढा, भावंडांबाबतची तिची जबाबदारी आणि तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात युगने उभी केलेली आव्हाने अशा चौफेर समस्येत कैरी अडकली आहे. मला या कथानकात कैरी जी शांतपणाची ताकद दाखवते, प्रश्न सोडवण्याची वृत्ती दाखवते ते मला फार आवडले आहे. याचे कारण म्हणजे योग्य विचार करण्याची ताकद तिच्यात आहे. बाकी सगळे अनिश्चित असले तरी जे आपल्याकडे आहे ते मनोभावे सांभाळले पाहिजे हे या कथेतून सांगितले आहे. प्रेक्षकांना भावनिक कलाटण्या आणि अनपेक्षित निर्णय बघायला मिळतील.”