Home आरोग्य पर्यावरणपूरक जीवनशैली आणि मानसिक आरोग्य विषयावर  परिसंवाद संपन्न,पर्यावरणाचे रक्षण करण्याचे तज्ञांनी केले आवाहन

पर्यावरणपूरक जीवनशैली आणि मानसिक आरोग्य विषयावर  परिसंवाद संपन्न,पर्यावरणाचे रक्षण करण्याचे तज्ञांनी केले आवाहन

17 second read
0
0
20

no images were found

पर्यावरणपूरक जीवनशैली आणि मानसिक आरोग्य विषयावर  परिसंवाद संपन्न,पर्यावरणाचे रक्षण करण्याचे तज्ञांनी केले आवाहन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :  जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व स्वस्तीक हॉस्पिटल-न्युरो सायकॅट्रिक सेंटर कोल्हापूर यांच्या वतीने पर्यावरण पूरक जीवनशैली व मानसिक आरोग्य या विष‌यावर परीसंवाद आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी परिसंवादात पर्यावरण तज्ञ श्री. सुहास वायंगणकर यांनी आपल्या भाषणामध्ये. भारत हा जैवविविधतेने नटलेला समृद्ध  देश होता. पण नजीकच्या काळात १६००० प्रजाती नाहीशा झाल्या आहेत. आपली अवस्था “समृद्ध बापाची भिकारी मुलं असं अली झाली आहे. पर्यावरण वाचविणे ही  काळाची गरज आहे.२०३५ सालापर्यंत पाणी रेहानीग दुकानात मिळणार  असून प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारा, पाणी साठवा, पाणी वाचवा, झाडे  लावा आणि झाडे जगवा. स्वच्छ, सुंदर आप आपला परीसर ठेवा असे आवाहन केले.

       मानसिक आरोग्य या परीसंवादात स्वस्तिक हॉस्पिटले न्युरोसायकॅट्रीक सेंटरचे अध्यक्ष डॉ पी.एम्. चौगुले यानी सर्वसामान्य माणसाचे सर्वसामान्य मानसिक आजार व त्याला आपण कसा प्रतिबंध करावा याचे विवेचन केले. मानसिक आजार तज्ञ डॉ. कावेरी चौगुले यानी. मुलांच्या मानसिक समस्या व पालकाचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.तर मानसिक आजार तज्ञ डॉ. निखिल चौगुले यांनी “मानसिक आजार उपचार पध्दती व त्यामध्ये झालेले नवीन अमूलाग्र शोध याची मांडणी केली. 

       जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे यांनी अन्न वरून निवारा व शिक्षण याचबरोबरच पर्यावरणसुध्दा मूलभूत गरज आहे. सभासदांनी या पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडे लावावी असे नमूद केले.या कार्यक्रमास जी पी.ए चे डॉ.राजेश सातपुते, डॉ.सौ वर्षा पाटील, डॉ.सौ. पूजा पाटील, डॉ.सौ शुभांगी पार्टे,  डॉ.विलास महाजन, डॉ.राजेश कुंभोजकर, डॉ.शितल पाटील,डॉ,शिवाजी मगदूम,डॉ.किशोर निंबाळकर,डॉ,शशिकांत पाटील,डॉ,प्रशांत खुटाळे, डॉ.शिवराज जितकर, डॉ.शिवराज देसाई,डॉ. राजेश सोनवणे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.डॉ. स्नेहा जोगदंडे- डॉ. शितल मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. जी.पी.ए.  सचीव डॉ. महादेव जोगदंडे व खत्रानीस डॉ. गुणाजी नलवडे यानी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…