
no images were found
‘हेल्थ रेनिसन्स थेरपी’ आधुनिक उपचार पद्धतीबद्दल व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर/ प्रतिनिधी : आतापर्यंत मुंबई येथे कार्यरत असलेली इन्फिनिटी प्लस ही एक अग्रगण्य आरोग्य सेवा संस्था आता कोल्हापूरात नवीन शाखा सुरू करत आहे. इन्फिनिटी प्लस होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी क्षेत्रात नवीनतम आरोग्य सेवा आणत आहे.
त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हेल्थ रेनेसान्स थेरपी. होमिओपॅथी या जवळपास दोन शतकांहून जास्त काळ सुरू असलेल्या उपचार पद्धतीचे हे आधुनिक रूप आहे. या उपचार पद्धतीत फिजियोथेरपी, हायड्रोथेरपी, ओझोन थेरपी, पीईएमएफ थेरपी आणि अक्यूपंक्चर यासारख्या अत्याधुनिक उपचारांचा समावेश आहे. ही थेरपी आधुनिक वैधकीय विश्वातील सर्वोत्तम गोष्टी एकत्र आणून क्रांतिकारी पाऊल उचलत आहे.
कोल्हापुरातील फिजिओथेरपीसाठी अग्रगण्य मानले जाणारे हीलिंग टच हॉस्पिटल आणि इन्फिनिटी प्लस ह्या दोन अग्रगण्य संस्था एकत्र येऊन ह्या साठी प्रयत्नशील आहेत.
इन्फिनिटी प्लस या संस्थे चे ब्रीदवाक्य ” केअर फॉर कम्युनिटी ” नमूद करते की आधुनिक उपचार पद्धती आणि समाज ह्यांच्यातील दुवा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पारंपारिक उपचारांसोबत होमिओपॅथिक औषधे आणि व्यक्तीसापेक्ष विचार यात वापरत आहेत. इन्फिनिटी प्लस घेऊन येत असलेल्या हेल्थ रेनीसन्स थेरपी अर्थात आरोग्य पुनरुज्जीवन उपचार ही पद्धती “ इट्स वीदिन यू “ या विचारावर विश्वास ठेवते . म्हणजेच अस सांगू इच्छिते की सर्व काही तुमच्यामध्येच आहे. जस एखाद्या चांगल्या परिस्थितिची कारणे आपल्यामध्ये असतात तसंच आजरांच मूळही आपल्यातच असत. आणि त्यांना बर करण्याची क्षमतादेखिल आपल्यातच असते . हीच क्षमता ओळखून आणि वाढवून या थेरपीद्वारे इलाज करण्यात येतो . जशी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तसेच त्यांचे आजार , स्वभाव आणि आजाराची कारण वेगळी असतात . म्हणूनच इन्फिनिटी प्लसमध्ये एकाच आजारचे दोन रुग्ण असले तरी त्यांच्यासाठी व्यक्तिगत उपचार पद्धती आखली जाते.
ही एक आरोग्य क्रांती आहे. याच संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी रविवार दिनांक ९ जून रोजी हॉटेल कृष्णा इन, डी मार्ट शेजारी, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे ११ ते १ या वेळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे सर्वांसाठी खुले असून याचा कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिनिटी प्लसच्या मुख्य आणि हेल्थ रेंनीसन्स थेरपीच्या प्रणेत्या डॉ. गौरी खंडेराव आणि हिलींग टच फिजिओथेरपी क्लिनिक्सचे प्रमुख डॉ. ऋषिकेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
डॉ. गौरी खंडेराव या इन्फिनिटी प्लसच्या मुख्य डॉक्टर असून त्यांच्या सोबत डॉ. ऋषिकेश जाधव, डॉ. सुरेखा देवईकर, डॉ.पौर्णिमा एलरवार ,डॉ.माधवी गाडगे,डॉ. क्षितिज गुलहाणे अशी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व कुशल डॉक्टरांची टीम कार्यरत आहे . त्या ” आरोग्य पुनरुज्जीवन उपचारपद्धती “ हे आरोग्यसेवेतील एक महत्वाचा टप्पा आहे. ह्या उपचार पद्धतीने मेंदू आणि मेंदूविषयक विकार ,स्वमग्नता (ऑटीजम) मणक्याचे आजार,संधिवात , मधुमेह, रोगप्रतीकार क्षमतेच्या अभावाने होणारे आजार ,वंध्यत्व , अस्थिविकार अश्या अनेक आजारांवर इलाज शक्य आहे . व्याख्यानासोबतच उपस्थितामधील इच्छुक व्यक्तींसाठी मोफत आरोग्य चिकित्सा ही १० जून २०२४ रोजी हिलींग टच फिजिओथेरपी क्लिनिक्स , हॉटेल शिवास शेजारी , कलेक्टर ऑफिससमोर , नागाळा पार्क, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे .
इन्फिनिटी प्लस ही एक अग्रगण्य आरोग्य सेवा संस्था आहे, जी सर्वांगिण तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यक्तींना इष्टतम आरोग्य आणि चैतन्य प्राप्त
करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. आधुनिक विज्ञानाच्या मिश्रणाद्वारे इन्फिनिटी प्लस आपल्या रूग्णांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि सर्वसमावेशक काळजी प्रदान करते. एकात्मिक औषध आणि वैयक्तिक उपचार योजनांवर लक्ष केंद्रित करून, इन्फिनिटी प्लस व्यक्तींना त्यांच्या आरोग्याची पूर्ण क्षमता करण्यात मदत करण्यासाठी समर्पित आहे.
इन्फिनिटी प्लस आणि त्याच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया ९३७२३८४६२५ ,७९७७२७४५२४ ,७९७७२५१६३८ वर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.