Home स्पोर्ट्स जिल्ह्यातील सर्व पॉवरलिफ्टिंग खेळाडूसाठी निवड चाचणीचे २८ मे रोजी आयोजन

जिल्ह्यातील सर्व पॉवरलिफ्टिंग खेळाडूसाठी निवड चाचणीचे २८ मे रोजी आयोजन

12 second read
0
0
67

no images were found

 जिल्ह्यातील सर्व पॉवरलिफ्टिंग खेळाडूसाठी निवड चाचणीचे २८ मे रोजी आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पॉवरलिफ्टिंग खेळाडूसाठी निवड चाचणीचे आयोजन येत्या २८ मे २०२४ रोजी करण्यात आले आहे अशी माहिती

प्रा.डॉ प्रशांत पाटील,विजय वडगांवकर,सोनल सावंत,सुजित कुडाळकर,आकाश कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सब- ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, मास्टर्स जिल्हास्तरीय इक्वीपड पॉवरलिफ्टींग व राज्य निवड चाचणी  स्पर्धा २०२४ ही होत आहे.

ही स्पर्धा  F360° GYM NEAR राज कपूर पुतळा रंकाळा इथ होणार आहे.या स्पर्धेमध्ये सर्व प्रकारातील strong man /strong woman पुरस्कार्थी निवडले जातील व त्यांना प्रशस्तिपत्र बेल्ट व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी प्रवेश फी २५०/- रुपये इतकी असनार आहे.

या स्पर्धेतून दि ३० व ३१ मे दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर/ ज्युनिअर/ सिनिअर / मास्टर्स स्पर्धेसाठी पारदर्शकपणे जिल्हा संघ निवडन्यात येणार आहे.

यावेळी  आपल्या जिल्ह्याचे तसेच राज्याचे नाव पॉवरलिफ्टिंग या खेळाच्या माध्यमातून उंचावले आहे अशा सर्व खेळाडूंचा सत्कार  आयोजकांच्या मार्फत करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी आपल्या क्षेत्रातील तज्ञ- व अनुभवी पंचाना आमंत्रित केले जाणार आहे.या निवड चाचणीसाठी इच्छुकांनी 

  या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…