no images were found
जितो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंची मैदानी खेळ व बुद्धिबळात नेत्रदिपक कामगिरी
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- पदुकोण-द्रविड सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सलन्स,बेंगलोर येथे 24 व 25 मे दरम्यान झालेल्या जितोच्या (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आज संपन्न झाल्या. जलतरण,बॅडमिंटन,टेबल टेनिस,लॉन टेनिस,बुद्धिबळ व मैदानी खेळ अशा सहा क्रीडा प्रकारात घेण्यात आलेल्या या जितो च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जितो कोल्हापूर चॅप्टर च्या खेळाडूंनी मैदानी खेळ व बुद्धिबळात धवल यश संपादिले.मैदानी खेळात नऊ मेडल्स व बुद्धिबळात सहा मेडल्स अशी एकूण पंधरा मेडल्स ची लूट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यामध्ये आठ सुवर्ण,सहा रौप्य व एक कास्यपदक मिळाले आहे. मैदानी खेळात सांगलीच्या संस्कार हेरलेने सोळा वर्षाखालील गटात 100 व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले व अठरा वर्षाखालील मुलांच्या गटातही संस्कारने 100 व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. चार सुवर्णपदक मिळवणारा संस्कार हेरले स्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धक म्हणून निवडला गेला त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धकाचे *मॅन ऑफ द इव्हेंट* चषक प्रदान करुन सन्मानित केले.सांगलीच्या श्रेयान पाटील ने 14 वर्षाखालील मुलांचे गटात 100 मीटर धावण्याचे शर्यतीत सुवर्णपदक व 200 मीटर धावण्याचे शर्यतीत रौप्य पदक मिळविले.चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात सांगलीच्या प्रांजली टकलेने 100 मीटर मध्ये रौप्य पदक व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले तर सोळा वर्षाखालील मुलींच्या गटातही प्रांजलीने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळविले.
बुद्धिबळामध्ये जयसिंगपूरच्या दिशा व दिव्या पाटील या जुळ्या बहिणींनी 16, 18 व 20 वर्षाखालील मुलींच्या गटात निर्विवाद वर्चस्व मिळवत विजेते व उपविजेतेपद वाटून घेतले.दिशाने सोळा व वीस वर्षाखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक तर अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्य पदक मिळविले.दिव्याने अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक तर सोळा व वीस वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्यपदक मिळविले.सर्व पदक विजेत्यांना गिफ्ट व्हौचर देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय महिला क्रिकेटपटू श्रेयांका राजेश पाटील या होत्या.
या सर्व यशस्वी पदक विजेत्या खेळाडूंना जितो कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष गिरीश शहा,उपाध्यक्ष रवी संघवी, मुख्य सचिव अनिल पाटील,खजिनदार रमणभाई संघवी,कन्व्हेनर जितेंद्र राठोड,लेडीज विंग अध्यक्षा श्रेया गांधी,सचिव माया राठोड यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.जितो कोल्हापूर संघासोबत व्यवस्थापक म्हणून कविता पाटील, सचिन हरोले, सन्मती कर्वै,अमोल पाटील व चेतन नांदणीकर यांनी सर्वांची उत्तम व्यवस्था केली.