
no images were found
नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार
मुंबई, : देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे
राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. उच्चाधिकार समितीने कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. राज्यात ठरवून दिलेले दर हे ‘एचएसआरपी ‘ नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत.
अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन ४२० ते ४८० रुपये, तीन चाकी वाहन ४५० ते ५५०, चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपये, तीन चाकी . यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते.
केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ‘ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक आहे.तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम (SIAM) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.