Home आरोग्य 15 ते 25 डिसेंबरअखेर गोवर रुबेला लसीकरण विशेष मोहिम

15 ते 25 डिसेंबरअखेर गोवर रुबेला लसीकरण विशेष मोहिम

1 second read
0
0
159

no images were found

15 ते 25 डिसेंबरअखेर गोवर रुबेला लसीकरण विशेष मोहिम

कोल्हापूर : सद्या राज्यातील मुंबई तसेच उपनगरामध्ये गोवर रुणांची संख्या पहाता त्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना निर्देश दिलेले आहेत. यासाठी सर्वांनी सतर्क राहून अधिक गतीमान ने कृतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयाची जळजळ, चेह-यावरील आणि शरीरावर लाल सपाट पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर गोवरची लक्षणे दिसून येत असून लसीकरणामुळे हा आजार टाळता येणारा आहे. या आजाराची लक्षणे आढळलेस घाबरुन न जाता संबंधीतांनी महानगरपालिकेच्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. या उपाययोजनेच्या अनुषंगाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा स्वयंसेवक व एएनएम यांच्याद्वारे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.  आरोग्य विभागाच्यावतीने आज अखेर 23,085 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून यामध्ये 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गोवर रुबेला सदृश्य लक्षणे आढळलेली नाहीत. या सर्व्हेक्षणादरम्यान पात्र बालकांना जीवनसत्व अ चे डोस महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहेत. तसेच सर्व्हेक्षणा दरम्यान ज्या पात्र बालकाचा गोवर रुबेलाचा डोस राहून गेला आहे अशांची यादी करुन या बालकांसाठी दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधील गोवर लसीकरणाच्या विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान पात्र बालकांनी नजिकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून लसीकरण करुन घ्यावे. याशिवाय शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना देखील आवाहन करण्यात येते की, त्यांचेकडे ताप, पुरळ इत्यादी लक्षणे असलेला गोवर सदृष्य रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात यावी.

तरी शहरातील 9 महिने ते 11 महिने वयोगटातील मुलांना गोवर रुबेलाचा पहिला डोस व 16 ते 24 महिने वयोगटातील मुलांना गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात यावा. तसेच जीवनसत्व ए चा डोस दिला नसेल तर अशा पात्र लाभार्थीनी महापालिकेच्या नजिकच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…