no images were found
महात्मा जोतिबा फुले यांचे स्त्री सक्षमीकरणसाठीचे योगदान अमूल्य : अर्चना जगतकर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, मेडीकल एनफार्मेशन मॅनेजमेंट आणि फार्मासुटिकल यांच्या संयुक्त विद्यमाने ”महात्मा जोतिबा फुले यांचे स्त्री सक्षमीकरणसाठीचे योगदान” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होतेे. सदरचे व्याख्यान देण्याकरिता प्रा.डॉ.श्रीमती अर्चना राजकुमार कांबळे (जगतकर), विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, न्यु कॉलेज, कोल्हापूर यांना निमंत्रित केले होते. त्यांनी वरील सर्व शास्त्र शाखेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना अतिशय उपयुक्त असे सामाजिक विविध प्रश्नांची मार्गदर्शनात्मक उकल केली. अतिशय सोप्या आणि ओघवती भाषेमध्ये आणि संदर्भासहित विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्यांनी सुरवातीस पुरातन काळापासून ते आजतागायत स्त्रियांना दिला जाणारी वागणूक कशी होती, ती कालांतराने कशी बदलत गेली, यामध्ये तिला समाजाने शिक्षणापासून कसे वंचित ठेवले, एकंदरीत शिक्षणामुळे तिच्या मध्ये झालेला बदल, यामध्ये महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छ.शाहू महाराज या महामानवांच्या योगदानमुळे सद्यपरिस्थितीमध्ये मिळणारे हक्क, सोयी-सुविधा याचे फलित आहे, असे अनेक संदर्भासहित मौलिक विचारमंथन केले.
यावेळी प्रा.डॉ.के.डी.सोनवणे, जीवरसायनशास्त्र अधिविभागप्रमुख, डॉ.श्रीमती पी.बी.दांडगे, विभागीय समन्वयक आणि सहयोगी प्राध्यापक, श्री. नितीन नाईक, सहा.प्राध्यापक, श्रीमती सीमा बुवा, सहा.अधीक्षक तसेच एम.एस्सी. भाग-2 चे सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीं उपस्थित होते.