no images were found
आषाढी वारीसाठी वारक-यांच्या वाहनांना पथकरातुन सूट
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरला जाणा-या पालख्या तसेच भाविकांच्या व वारक-यांसाठीच्या वाहनांना पथकरातुन सुट देण्याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर ही सवलत लागू करण्यात येत आहे.
दि. १५ जुलै २०२२ पर्यंत पंढरपुरला जातेवेळी व येतेवेळी पालख्या, भाविक व वारक-यांच्या हलक्या व जड वाहनांकरीता पथकर सवलत देण्यात आली आहे. त्याकरीता जे भाविक/ वारकरी पंढरपुर येथे जाणार आहेत त्यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर तसेच प्रादेशिक परीवहन अधिकारी, कार्यालय कोल्हापूर येथुन वाहनाकरीता पास देण्यात येतील. हे पास पथकर सवलती करीता ग्राह्य धरले जातील.
पंढरपुर आषाढी वारीकरीता जाण्या-या पालख्या, हलक्या व जड वाहनातुन जाणारे भाविक, वारकऱ्यांनी शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूर तसेच प्रादेशिक परीवहन अधिकारी, कार्यालय कोल्हापूर येथून पास घेवून जावेत, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.