Home राजकीय  विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन-वूर्टेमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार

 विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन-वूर्टेमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार

6 second read
0
0
26

no images were found

 विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन-वूर्टेमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार

स्टुटगार्ट  – कौशल्यविकास, शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबत महाराष्ट्राशी तातडीने सांमजस्य करार करण्यास जर्मनीतील बाडेन-वूर्टेमबर्ग राज्य सरकार उत्सुक आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना होईल आणि त्यांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी मिळेल, अशी ‘गुड न्यूज’ महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री श्री. दीपक केसरकर यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारने कौशल्यविकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास श्री. केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्यविकास व उद्योजकता विकासमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा आणि उच्च शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य मिळाले. उद्योग-परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात अग्रस्थानी राहावा, मराठी तरुणांना रोजगार मिळावा, असा संकल्प महाराष्ट्राच्या नेतृत्वाने सोडला आहे. मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे तेच धोरण आहे. महाराष्ट्र सरकारच्या याच धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने आपण जर्मनीच्या दौऱ्यावर आलो. मुख्यमंत्री मा. श्री. शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. फडणवीस साहेब यांनी पुढाकार घेतला आणि दोन्ही नेत्यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच हा दौरा यशस्वी झाला, असे श्री. केसरकर यांनी आवर्जून सांगितले.

जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या श्री. केसरकर यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्यविकास प्रशिक्षण, पर्यटनाला चालना, जर्मन भाषा शिक्षण या महत्वाच्या विषयांवर सोमवारी (दि. १५) व मंगळवारी (दि. १६) तीन बैठकांमध्ये विविध मुद्दे मार्गी लावले. त्यातील चर्चेचे फलित म्हणून महाराष्ट्र व बाडेन-वूर्टेमबर्ग राज्यांमध्ये लवकरच सामंजस्य करार केला जाईल. त्यासाठी बाडेन-वूर्टेमबर्गच्या सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रीतसर आमंत्रित केले आहे. बाडेन-वूर्टेमबर्ग जर्मनीतील सर्वांत संपन्न, औद्योगिकरदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. त्याच्याशी महाराष्ट्राचे दीर्घकाळापासून संबंध आहेत. ते आता अधिक दृढ होतील, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.

श्री. केसरकर म्हणाले, “भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. सेवा क्षेत्राच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय तरुण जगातील प्रगत देशांत जातील आणि आपल्या कामाद्वारे भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवतील, असेच पंतप्रधानांना अपेक्षित आहे. त्यांचे हे स्वप्न बळकट करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना नोकरीची संधी मिळेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…