Home सामाजिक म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आणि भागीदारांना सुधारित सुलभता देण्याचे ध्येय

म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आणि भागीदारांना सुधारित सुलभता देण्याचे ध्येय

29 second read
0
0
34

no images were found

म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आणि भागीदारांना सुधारित सुलभता देण्याचे ध्येय

सातारा  – कोटक म्युच्युअल फंड (KMF), सातारा येथे त्यांच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. हे पाऊल ग्राहकांना गुंतवणुकीसाठी सुलभताउपलब्ध करून देण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रात कंपनीच्या पदचिन्हांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने केले जात आहे. ही शाखा दुकान क्रमांक २  तळमजला, ओके प्राइड सातारा तालुका पोलीस स्टेशन समोर राधिका रोड सातारा ४१५००२ महाराष्ट्र येथे आहे. गुंतवणूकदार कोटक म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या उपायांबद्दल माहिती मिळवण्यासाठी शाखेला भेट देऊ शकतात. या नवीन शाखेमार्फत गुंतवणूकदारांना कोटकची टीम योग्य सहाय्य करेल.

३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत सातार्‍यात रु. ३५०० कोटी पेक्षा जास्त असेट अन्डर मॅनेजमेंट (AUM) होते. आणि थेट एसआयपी संख्या 180000 ओलांडली आहे. हे आकडे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड आणि पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) ची वाढती लोकप्रियता दर्शवू शकतात. (स्रोत: केएमएस इंटरनल रेसर्च सीएएमएस)कोटक म्युच्युअल फंड एक प्रभावी गुंतवणूक साधन म्हणून एसआयपी चा सक्रियपणे प्रचार करत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांची शिस्त आणि नियमित गुंतवणूकीचे नियोजन करता येते. कंपनी म्युच्युअल फंड योजनांची विस्तृत श्रेणी ऑफर करते.

मनीष मेहता, नॅशनल हेड – सेल्स, मार्केटिंग आणि डिजिटल बिझनेस, कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड म्हणाले, “आम्ही कोटक म्युच्युअल फंडात एसआयपी साठी सक्रियपणे प्रचार करत आहोत, ज्याने गेल्या काही वर्षांपासून लोकप्रियता मिळवली आहे. अस्थिरतेच्या काळातही एसआयपी नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूकदारांसाठी संतुलित नियोजन करून देते. गुंतवणूकदार आमच्या सध्याच्या कोणत्याही योजनांमधून निवड करू शकतात आणि एसआयपी मार्गाने गुंतवणूक सुरू करू शकतात. आमचा उद्देश गुंतवणुकदारांना आमच्या म्युच्युअल फंड उत्पादने आणि सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीत सहज प्रवेश प्रदान करून देणे आहे.”

शाखा विस्तारासोबतच कोटक म्युच्युअल फंडाने www.kotakmf.com या वेबसाइटचे नूतनीकरण केले आहे. ज्यामुळे वितरक आणि क्लायंटना पोर्टफोलिओ तपशील, तज्ञांचे माहितीपूर्ण ब्लॉग्स, व्हिडिओ आणि ऑनलाइन व्यवहार सुविधा सहज उपलब्ध होतात. कोटक बिझनेस हब वितरकांसाठी एक समर्पित पोर्टल आहे. भागीदारांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी क्लायंट माहिती, को-ब्रंडिंग माहिती, अनॅलिटीकल टूल्स यांसारखी साधने अॅक्सेस करण्याची परवानगी देते. तसेच, कोटक म्युच्युअल फंडाच्या प्रोस्टार्ट ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रमाला वितरण भागीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामध्ये आर्थिक नियोजन,निश्चित उत्पन्न बाजार आणि कोटक प्रोस्टार्ट या YouTube चॅनेलवर उपलब्ध इतर गुणात्मक विषय समाविष्ट आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…