no images were found
सतेज पाटील गटाची कोल्हापूर दक्षिणमध्ये १२ पैकी १० ग्रामपंचायतीमध्ये सरशी
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव आणि मोरेवाडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता राखली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ५३ गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होती. यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १२ पैकी १० ग्रामपंचायतींमध्ये विजयाचा दावा केला आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव आणि मोरेवाडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस आघाडीच्या सरपंचपदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. पाचगावच्या सरपंचपदी प्रियांका संग्राम पाटील, मोरेवाडीच्या सरपंचपदी आनंदा कांबळे हे निवडून आले आहेत. वाकरे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी अश्विनी चंद्रकांत पाटील विजयी झाले आहेत. कंदलगावमध्ये सरपंचपदाचे उमेदवार राहुल वसंत पाटील विजयी झाले आहेत. न
गांधीनगर : ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतराचे चित्र- कोल्हापूर दक्षिणमधील गांधीनगर ग्रामपंचायतीत महाडिक गटाचा विजय झाला आहे. सरपंचपदी महाडिक आघाडीच्या संदीप पाटोळे यांचा विजय झाला आहे. दरम्यान, करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा, सादळे मादळे, वरणगे, हसूर, सावर्डे दुमाला, हिरवडे दुमाला, वडणगे कांडगाव या गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. दुसरीकडे दऱ्याचे वडगाव, कावणे, दिंडनेर्ली, पाडळी बुद्रुक आणि सोनाळीत सत्ता अबाधित आहे.
शिरोळ : शिरोळ तालुक्यामध्ये १७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखला आहे. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करून १७ पैकी १० ठिकाणी सरपंचपद मिळवून यश मिळवले आहे.