Home राजकीय प्रयाग चिखलीच्या सरपंचपदी रोहित रघुनाथ पाटील

प्रयाग चिखलीच्या सरपंचपदी रोहित रघुनाथ पाटील

4 second read
0
0
165

no images were found

प्रयाग चिखलीच्या सरपंचपदी रोहित रघुनाथ पाटील

कोल्हापूर :  गुऱ्हाळगॄहाचे आगर गाव म्हणून प्रसिद्ध असणारे प्रयाग चिखली गावाच्या सरपंचपदी रोहित रघुनाथ पाटील हे विजयी झाले. रोहितचे वडील रघुनाथ पाटील उर्फ रघु पाटील हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक आहेत. सरपंच गटाचे नेतृत्व महाडिक गट, आमदार सतेज पाटील गट, आमदार पी.एन. पाटील गट, भाजप, राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  केले.

सरपंचपद रोहित रघुनाथ पाटील यांना जरी मिळाले असले तरीही गोकुळचे विद्यमान संचालक एस. आर. पाटील गटाने ९ जागा जिंकत सत्ता काबीज केली आहे. सरपंच पद एका गटाकडे  तर सत्ता दुसऱ्या गटाकडे असे चित्र सध्या  समोर येतेय. महादेवराव महाडिक यांचे समर्थक रघु पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सरपंच पदाच्या या निवडणुकीमध्ये २५० मते अधिक मिळवित गोकुळचे विद्यमान संचालक एस. आर. पाटील यांचे बंधू हंबीरराव पाटील यांचा पराभव केला. ज्येष्ठ विरुद्ध तरुण अशा गटात ही निवडणूक झाली.  ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत एस. आर. पाटील गटाने ९ जागा जिंकल्या तर विरोधी सरपंच गटाने सहा जागांवर विजय मिळवला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसाद

डीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसाद : २००० हून अधिक विद्यार्…