Home सामाजिक अभिनेते मिलिंद सोमण २१ डिसेंबरला  कोल्हापुरात

अभिनेते मिलिंद सोमण २१ डिसेंबरला  कोल्हापुरात

0 second read
0
0
191

no images were found

अभिनेते मिलिंद सोमण २१ डिसेंबरला  कोल्हापुरात

कोल्हापूर : प्रदुषणमुक्त पृथ्वी आणि निरोगी स्वस्थ जीवनासाठी प्रदूषण टाळा असा संदेश देत प्रसिद्ध अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण हे सायकलवरून देशातील विविध राज्यांचा दौरा करीत आहेत. या अंतर्गत बुधवार (२१ डिसेंबर) ला सकाळी ११.३० वाजता त्यांचे कोल्हापुरात आगमन होणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने हा उपक्रम होत असून, बुधवारी बँकेच्या वतीने मिलिंद सोमण यांचे तावडे हॉटेल परिसरात जंगी स्वागत होणार आहे. अशी माहिती बँकेचे क्षेत्रीय प्रमुख श्री. प्रशांत आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभिनेते मिलिंद सोमण हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकलवरून कोल्हापुरात बुधवारी सकाळी ११.३० वाजता येतील. तावडे हॉटेलजवळ बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत करतील. त्यानंतर कोल्हापुरातील वीस ते पंचवीस सायकलस्वार सोमण यांच्यासोबत रॅलीत सहभागी होतील. सोमण हे बँक ऑफ बडोदाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेमस्टोन बिल्डिंगमधील क्षेत्रीय कार्यालयाला भेट देतील. त्या ठिकाणी सोमण हे उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांशी संवाद साधतील. बँकेच्या ग्राहकांनी पेपरलेस वर्कसाठी बीओबी हे अॅप्लीकेशन जास्तीत जास्त वापरावे यासाठी ते प्रबोधन करतील. तसेच त्यांच्या हस्ते उपस्थितांना रोपवाटप केले जाईल. त्यानंतर ते बंगळूरला रवाना होतील. २५ डिसेंबरला स. ११.०० वाजता बंगळूरमध्ये त्यानंतर २६ डिसेंबरला स. ७.३० वाजता म्हैसूर शहरात आणि सायं. ४.३० वाजता मंगलोरला भेट देणार आहेत असे बँकेचे क्षेत्रीय विकास प्रबंधक मोहसीन शेख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला बँकेचे उपक्षेत्रीय प्रमुख देविदास पालवे, शिवाजी चौक शाखाप्रबंधक सचिन देशमुख उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे क…