Home शासकीय गणेश मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

गणेश मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

0 second read
0
0
236

no images were found

गणेश मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

 पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज गणपती मंडळांसोबत झालेल्या बैठकीत पत्रकार परिषद घेत उत्सव साजरा करण्याबाबत घोषणा केली. यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील शेवेटचे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानी असेल. धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करु, असं मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलं आहे. त्यामुळे गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह संचारला आहे. “पुण्याच्या गणपती मंडळाला ऐतिहासिक वारसा आहे. अनेकजण गणेशोत्सव पाहायला येत असतात. काही मागण्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी मंडळांसोबत बैठक पार पडली. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे सण-उत्सव साजरा करता आला नव्हता. पण आता सगळे नियम पाळून उत्सव साजरा करायचा आहे. मंडप शुल्क माफ केलाय. परवानगीसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. गणपती उत्सव मंडळांना अडचण येणार नाही. जिल्हाधिकारी सगळं पाहतील. मिरवणुका नियम पाळून करू, कुठल्याही अडचणी येणार नाही हे पाहू. कोर्टाचे नियम पाळू”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …