no images were found
शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणीला होईल सुरुवात…
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांना शिवनेतील एका मोठा आमदारांच्या गटाचा पाठिंबा मिळाला होता. याच आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता शिवसेनेच्या वतीने या आमदरांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशा मागणीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच शिंदे सरकारने विधानसभेत विश्वास ठराव जिंकला त्याविरोधात देखील शिवसेनेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. आज बुधवारी शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याच सुनावणीवर शिंदे सरकारचे पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.