
no images were found
कर्नाटकाच्या विधानसभेत सावरकरांचा फोटो लावल्याने प्रचंड गदारोळ
बंगळुरू : कर्नाटकाच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावल्याने गदारोळ झाला . विधानसभा असेंबली हॉलमध्ये सावरकरांचा फोटो लावल्याने राज्य सरकारच्या या कृतीचा काँग्रेसने निषेध नोंदवला आहे. सावरकर ही वादग्रस्त व्यक्ती होती. त्यांचा फोटो असेंबली हॉलमध्ये लागता कामा नये, असं काँग्रेसने म्हटलंय. तर सावरकरांचा फोटो लावायचा नाही तर काय दाऊदचा फोटो लावायचा का? असा सवाल भाजपने केला आहे. दरम्यानस काँग्रेस आमदारांनी पंडीत नेहरू यांच्यासह इतर महापुरुषांचे फोटो हातात घेऊन जोरदार निदर्शने केली.
कर्नाटकाच्या विधानसभेच्या असेंबली हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या फोटोचं आज सकाळी अनावरण करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांच्यासह काँग्रेस आमदारांनी जोरदार निदर्शने केली. काँग्रेस आमदारांनी या संदर्भात कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना पत्रंही लिहिलं. विधानसभेत महात्मा गांधी, बसवन्ना, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचेही फोटो लावण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते तुरुंगात एक दिवसही राहू शकत नाहीत. काँग्रेसने देशासाठी त्याग केला असं तुम्ही वारंवार म्हणताय. तुम्ही ज्या काँग्रेसबाबत म्हणताय ती काँग्रेस ही नाही. आजची काँग्रेस बोगस आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली.सावरकरांचा फोटो लावल्याने तुम्हाला दु:ख झालं. सिद्धरामैय्या यांना विचारा मग विधानसभेत दाऊद इब्राहिमचा फोटो लावायचा आहे का?