Home स्पोर्ट्स वर्ल्ड कप ट्रॉफी अनावरणाचा दीपिका पदुकोणला मान

वर्ल्ड कप ट्रॉफी अनावरणाचा दीपिका पदुकोणला मान

0 second read
0
0
238

no images were found

वर्ल्ड कप ट्रॉफी अनावरणाचा दीपिका पदुकोणला मान

दोहा : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या उपस्थितीत सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फुटबॉल विश्व कप फायनल हा सामना भारतासाठी खास ठरला. दीपिकानं फिफा वर्ल्ड कप२०२२ ची ट्रॉफी लॉन्च केली. यासोबत दीपिकानं एक नवा रेकॉर्ड केला आहे. फिफा ट्रॉफी लॉन्च करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाला फिफा ट्रॉफी रिव्हिल करण्यासाठी यासाठी निवडले कारण ती यंदाच्या वर्षी मे महिन्यातील लग्झरी क्लोदिंग आणि एक्सेसरीज ब्रँड लुई वुइटनची ग्लोबल एम्बॅसिडर होती. तर लुई वुइटन २०१० पासून फिफा वर्ल्ड कपची पार्टनर होती. गेल्या दहा वर्षांपासून फुटबॉल विश्व कपच्या सपोर्टमध्ये असल्यानं त्यांची ग्लोबल एम्बॅसिडर दीपिका पदुकोणला १८ डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स फायनलमध्ये ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी निवडले. सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेटिंनानं थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर अर्जेंटिनाने फ्रान्सवर ४-२ अशी मात केली आणि ३६ वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून घेतला. कतारच्या लुआस स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स हा अंतिम सामना रंजक झाला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गोकुळची आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णय

गोकुळची आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत …