
no images were found
कोल्हापूर : आपले विचार, कार्य व प्रतिमा यातून लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभाविपणे मांडणारे साहित्यरत्त्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त, सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे व जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन साळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण, आणि जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यालयात कार्यरत सर्व बाहयस्त्रोत कर्मचारीही उपस्थित होते. सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी साहित्यरत्त्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
समाज कल्याण विभागाच्यावतीने दुपारी 3 ते 5 या वेळेत बहुजनांचे अण्णाभाऊ समजून घेताना या विषयावर प्रकाश नाईक, सरूड यांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानास जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, समाज कल्याण अंतर्गत कार्यरत शासकीय निवासीशाळा, शासकीय वसतिगृहे, आश्रम शाळा, मुख्याध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी तसेच इतर बहुतांशी महाविद्यालये, शिवाजी विद्यापीठ, सायबर महाविद्यालयाचे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते.