
no images were found
विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले सगळ्यांचे आभार.
मुंबई: आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले. एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.