Home राजकीय “असशील तिथून तुला उचलणार”: मोहित कंबोज

“असशील तिथून तुला उचलणार”: मोहित कंबोज

14 second read
0
0
37

no images were found

“असशील तिथून तुला उचलणार”: मोहित कंबोज                          भारतीय जनता पक्षाचे सदस्य मोहिम कंबोज यांनी एका एक्स युजरला जाहीर धमकी दिली आहे. माझं पुढील टार्गेट गजाभाऊ… पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार”, असं मोहित कंबोज म्हणालेत. त्यांच्या या जाहीर धमकीनंतर त्यांच्यावर टीकेचा मारा झाला. महायुतीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांचं समर्थन केलं तर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली.

         गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गजाभाऊ हे एक्स हँडल तुफान चर्चेत आहे. तसंच भाजपा आणि महायुतीमधील पक्षांवर टीका करत या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. “जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग” असं या हँडलवरील बायोमध्ये लिहिलं असून, हे हँडल व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने फॉर्च्युनर आणि लिजेंडरच्या निओ ड्राइव्ह 48व्ही व्हेरियंट्स केल्या लॉन्च

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने फॉर्च्युनर आणि लिजेंडरच्या निओ ड्राइव्ह 48व्ही व्हेरियंट्स केल्…