
no images were found
राजा कृष्णदेवरायाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता आदित्य रेडिज
सोनी सबवरील बहुप्रतीक्षित मालिका तेनाली रामा 16 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता सुरू होत आहे. या मालिकेत महान राजा कृष्णदेवरायाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आदित्य रेडिज या प्रतिभावान अभिनेत्याला घेण्यात आले आहे. अभिनयातील बारकावे जाणणारा आणि पडद्यावर आपली ठसठशीत उपस्थिती नोंदवणारा आदित्य रेडिज यावेळी भारताच्या इतिहासातील एका अत्यंत लोकप्रिय आणि पराक्रमी राजाची भूमिका करणार आहे आणि आपली मोहकता या भूमिकेला आणि मालिकेला बहाल करणार आहे.
राजा कृष्णदेवराय हा भारताच्या इतिहासातील एक महान शासक म्हटला जातो. आपल्या विजयनगर सम्राज्याचे सर्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी हा निडर आणि न्यायनिष्ठ राजा निरंतर प्रयत्नशील राहिला. सचोटी, नैतिकता ही मूल्ये जपणाऱ्या या राजाच्या दरबारी अनेक प्रबुद्ध लोक होते, ज्यामध्ये अष्टदिग्गजांचा समावेश आहे. अष्टदिग्गज हे आठ पंडित आणि सल्लागार होते, ज्यापैकी एक होता तेनाली रामा. आपल्या प्रजेविषयीची आणि त्यांना न्याय मिळावा याबाबतची त्याची निष्ठा अत्यंत दृढ होती. त्याच्या या गुणांमुळे इतिहासात त्याचे अनन्य स्थान आहे आणि पडद्यावरील मालिकेतही ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
कृष्णदेवराय राजाचा एक आकर्षक पैलू म्हणजे तेनाली रामाशी असलेले त्याचे मैत्रीपूर्ण नाते. आदित्यने साकारलेल्या या भूमिकेतून राजाला तेनालीच्या चातुर्याबद्दल आणि विनोदी स्वभावाबद्दल जो आदर होता तो दिसून येईल. राजाच्या लेखी तेनाली रामा हा एक विश्वासू सल्लागार आणि प्रिय मित्र आहे. त्या दोघांच्या नात्यात विनोद, रणनीती आणि नाट्य यांचे मिश्रण दिसते.आपल्या अष्टपैलू अभिनयाबद्दल ओळखला जाणारा आदित्य रेडिज या भूमिकेविषयीची उत्सुकता व्यक्त करताना म्हणतो, “राजा कृष्णदेवराय ही एक सर्वांना आवडेल अशी व्यक्तिरेखा आहे. मी ही भूमिका साकारत असताना त्यातील जबाबदारीची मला जाणीव आहे. या व्यक्तिरेखेची ताकद आणि सौहार्द जपण्याकडे माझा कल असेल आणि त्याचवेळी या भूमिकेला मी माझ्या दृष्टिकोनाची जोड देखील देण्याचा प्रयत्न करेन. तेनाली रामाच्या चाहत्यांशी निगडीत होण्यास मी उत्सुक आहे. त्यांनी दिलेले प्रेम आणि आधार हीच या मालिकेची ताकद आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांशी प्रामाणिक राहण्याचा आणि हा प्रवास संस्मरणीय बनवण्याचा मी प्रयत्न करेन.”बघा आदित्य रेडिजला कृष्णदेवराय राजाच्या भूमिकेत, ‘तेनाली रामा’ मालिकेत आणि तेनाली रामाच्या गोष्टी उलगडताना राजाचे न्यायदान देखील अनुभवा.