
no images were found
देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड
मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलंय. ते विदर्भातील पाचवे व नागपूरचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील.
फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्री राहिल्यानंतर २०१९मध्ये औटघटकेचे मुख्यमंत्रीपद वगळता ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली होती.
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला. तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.