
no images were found
नरडाणा येथे कार अपघातात पती पत्नी व चिमुकली ठार
पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकलीवर आज अंत्यसंस्कार
नाशिक : धुळ्याजवळ नरडाणा येथे चारचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात उत्तमनगरचे पती-पत्नी तसेच चालकही ठार झाल्याची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. उत्तमनगर येथील संदीप शिवाजी चव्हाण (43) व त्यांची पत्नी मीना संदीप चव्हाण (31) ठार झाले. त्यांच्या कारचा चालक हितेश अरुण चौधरी (28, रा. म्हसरूळ) हाही ठार झाला. चव्हाण यांना दोन मुली आणि मुलगा आहे. त्यांच्या दोघी मुली जखमी झाल्या होत्या. दरम्यान या अपघातातील त्यांची मुलगी परी (6) हिचे रात्री उपचार सुरु असताना निधन झाले. पती, पत्नी व त्यांची 6 वर्षीय मुलगी परी असे तिघांवरही आज सायंकाळी मोरवाडी अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.