
no images were found
सांगली : जरंडी (ता. तासगाव) येथील दोन युवकांनी एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. शुभम साहेबराव शिंदे व राजेंद्र मोहन शिंदे या दोघांवर याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगीचे आई-वडील काही दिवसांसाठी परगावी गेल्यावर ही घटना घडली. त्यावेळी घरी पीडित मुलगी, तिचा भाऊ व मावशी घरी होते. आई-वडील परगावाहून परत आले. त्यावेळी मुलगी तणावात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने संशयित राजेंद्र व शुभम यांनी तिला मारहाणीची धमकी देत बलात्कार केल्याचे सांगितले. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.