
no images were found
हिंगोली येथे तिरुपतीला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात : ३ ठार, ११ जखमी
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील वानखेडे परिवार तिरुपती दर्शनासाठी गाडीने गेले होते. तिरुपती दर्शन घेऊन आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला जात असताना बेंगलोर महामार्गावर चालकाचा गाडीवरील (क्रमांक MH 27 AR 8315) ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्यावरील दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात डोंगरकडा येथील पती पत्नीसह १ जण ठार झाला. ही घटना रविवारी (दि. 31) रात्री अकरा वाजता घडली. अपघातात डोंगरकडा येथील शंकर लोमटे (वय 40) पत्नी रेखा शंकर लोमटे (वय 35) राजू वानखेडे (वय 40) हे तिघेजण जागीच ठार झाले असून अन्य ११ जणांना जखमी अवस्थेत चित्रदुर्गा जिल्ह्यातील चित्रदुर्गा शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. डोंगरकडा येथील वानखेडे परिवार देवदर्शनला गेले असता त्यांच्यावर काळाने मोठा घाला घातल्यामुळे डोंगरकडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.