no images were found
संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ‘ईडी‘ कोठडी
मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली. तत्पूर्वी संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
न्यायमूर्ती एम. जी. देशापाडे यांच्या न्यायालयासमोर आज सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्या वतीने युक्तीवाद केला. तर ‘ईडी’कडून हितेन वेणेगावकर यांनी युक्तीवाद केला.