Home शासकीय दीपावलीत ‘अमृत’ संस्थेचा ‘दुर्गोत्सव’ उपक्रम

दीपावलीत ‘अमृत’ संस्थेचा ‘दुर्गोत्सव’ उपक्रम

10 second read
0
0
61

no images were found

 दीपावलीत ‘अमृत’ संस्थेचा ‘दुर्गोत्सव’ उपक्रम

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रतिष्ठान (अमृत) संस्थेतर्फे यंदाच्या दीपावलीत ‘दुर्गोत्सव २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या १२ दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून त्यांना अनोखी मानवंदना देण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे.

      राज्यभरातील नागरिकांनी आपल्या घरात, बाल्कनीत अथवा सोसायटी परिसरात या १२ दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती साकारून, त्यासोबतचा सेल्फी www.durgotsav.com या संकेतस्थळावर पाठवायचा आहे. सहभागी सर्वांना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे “अभिनंदन पत्र” देण्यात येणार असून, शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासावर आधारित ‘अमृत विद्यालय’ या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मवरील ९९९ रुपयांचे प्रशिक्षण नि:शुल्क उपलब्ध करून दिले जाईल.

      या दुर्गोत्सवाचा शुभारंभ शिवसृष्टी हिस्तॉरिकल थीम पार्क, पुणे येथे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांच्या हस्ते झाला. अमृत संस्थेने राज्यातील आबालवृद्धांना आवाहन केले आहे की, “या दीपावलीत दुर्गाची प्रतिकृती साकारून, शिवरायांना अनोखी मानवंदना देऊ या!”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…