Home मनोरंजन प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

4 second read
0
0
43

no images were found

प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आपण अनेक कलाकृतींच्या माध्यमातून भेटत आलोय. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळालीय. स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत.

      चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. कनकदत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल.

       कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या,’माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अश्या पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनकदत्ताला पहाता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. अनेक कंगोरे आहेत या भूमिकेला. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी गूढ मालिका काजळमाया २७ ऑक्टोबरपासून रात्री १०. ३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…