
no images were found
नड्डा यांचे वक्तव्य हुकूमशाहीचे तर भाजपचे धोरण हिटलरशाहीचे : उद्धव ठाकरे
कोल्हापूर : भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे इतर पक्षाबाबतचे बोलणे भयानक असल्याचे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करतांना जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य हुकूमशाहीचे तर भाजपचे धोरण हिटलर शाहीचे असल्याने देशातील जनतेनेच वेळीच सावध झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच पत्रकार परिषद झाली यामध्ये त्यांनी भाजप अध्यक्षांचे बोलणे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अटकेबाबत आपले मत व्यक्त केले.
भाजपशी देशातील कोणताच पक्ष लढू शकत नाही या जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त करताना म्हणाले लोकांनीच काय ते ठरवायचं आहे. याबरोबरच सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहावे. वक्तव्य लोक देशाला लोक हुकूमशाहीकडे नेणारे आहे. आताचे राजकारण सुरू आहे ते घाणेरडे आहे.
संजय राऊत यांच्या बद्दल मला अभिमान असून त्यांच्या कुटुंबाची मी भेट घेतली आहे संजय राऊत हे पत्रकार आहेत निर्भीड आहेत स्वाभिमानी आहेत.त्यांचं मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही हे त्यांचे वाक्य महत्त्वाचे आहे. पण भाजपचे राजकारण मात्र अतिशय वाईट पद्धतीने सुरू आहे. भाजपकडून राजकारणात बुद्धीचा नव्हे तर बाळाचा वापर होत आहे. विरोधकांना अडकवून संपवण्याची हिटलरनिती देशात सुरू आहे..
राजकारणात दिवस फिरत असतात तुमचे गेले की कधी काय होईल ते कळेलच. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळ मी पदाची हवा डोक्यात शीरू दिली नाही. सत्ता येते, पद येते पण असे निर्घृणपणे वागणे योग्य नाही. प्रादेशिक पक्षाना संपवण्याचे कारस्थान भाजप करत असून नुकतेच कोशियारी यांनी केलेले वक्तव्य हा त्यातीलच एक प्रकार आहे. भाजपचा राजकारणातील भेसुरपणा स्पष्ट होत आहे. प्रादेशिक अस्मिता संपून टाकण्याचे राजकारण भाजपकडून होत आहे असे आरोपही उद्धव ठाकरे यांनी केले.