
no images were found
देखा ना हाय रे’ गाण्यावर केलेला आदिवासी डान्स पाहून अरुणा इराणी झाल्या थक्क
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या त्यांच्या डान्स रियालिटी शोच्या फॉरमॅटमध्ये डान्सचा महोत्सव दणक्यात सुरू आहे. या शनिवारी बॉलीवूडची लाडकी डान्सिंग क्वीन अरुणा इराणी या शो मध्ये येऊन आपली ‘सदाबहार’ किमया पसरवणार आहे. स्पर्धेतील स्पर्धक आपल्या कोरिओग्राफर्ससह 80 च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यांवर परफॉर्म करून अरुणा इराणी विशेष भागात त्या अष्टपैलू अभिनेत्रीला आदरांजली वाहताना दिसतील.महाराष्ट्राचा शिवम वानखेडे आणि त्याची कोरिओग्राफर सोनाली कर मिळून एक अनोखा आदिवासी डान्स सादर करून मंच दणाणून सोडताना दिसतील. बॉम्बे टू गोवा चित्रपटातील ‘देखा ना हाय रे’ गाण्यावर शिवम स्वतःची जीवन कहाणी सादर करताना दिसेल आणि अरुणा इराणीला मंत्रमुग्ध करून सोडेल. शिवमचे कौतुक करताना अरुणा इराणी उद्गारली, “हा परफॉर्मन्स खूपच छान होता. हे गाणे अशा रीतीने सादर होऊ शकेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. आणि मला नाही वाटत की, अमितजींनी देखील अशी कल्पना कधी केली असेल.”
परीक्षक सोनाली बेंद्रेने अरुणा इराणीला या गाण्याच्या शूटिंगची आठवण सांगण्याची गळ घातली. त्यावर अरुणा इराणी म्हणाली, “हे गाणे आम्ही स्टुडिओत चित्रित केले होते. आणि ते बऱ्यापैकी चांगले झाले होते. त्यावेळी अमितजी (अमिताभ बच्चन) देखील या क्षेत्रात नवे होते. त्यांनी या गाण्यासाठी खूप तालमी केल्या होत्या. बस खचून भरलेली होती, प्रत्येक सीटवर लोक बसलेले होते, त्यामुळे जर कुणाला नाचायचे असेल, तर तो काय करेल? ती जर कार असती, तरी काही शक्य झाले असते, पण बसमध्ये मात्र ते कसे जमेल कळत नव्हते. पण तरीही त्यांनी ते जमवले! अमितजींनी डान्स नीट बसवला आणि हे संपूर्ण दृश्य उत्तम रित्या साकारले. हे गाणे चित्रित करायला तीन दिवस लागले होते. त्यामुळे, व्हायचे काय की एखादा मागे बसलेला ज्युनियर आर्टिस्ट देखील नाचू लागायचा. अमितजी नाचत असताना कोणालाच नाचण्यात संकोच वाटत नव्हता. कठीण परिस्थितीत शेवटी गाणे चित्रित झाले. महमूद स्टुडिओमध्ये फॉक्स स्क्रीन होता. आणि ते बसमधले गाणे या स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आले होते. हा धावता पडदा होता, त्यामुळे वाहन चालत असल्याचा आभास त्यात होत होता. तो एक खूप अनोखा अनुभव होता पण हो, त्या गाण्यात नाचायला आणि हालचालींसाठी जागा खूपच कमी होती.” या भागात पुढे शिवमला लग्न करण्याची इच्छा आहे हे समजल्यावर अरुणा इराणी स्वतः खाष्ट सासूचा अवतार धारण करून एक जावई म्हणून शिवमची परीक्षा घेताना दिसेल. ही धमाल बघताना प्रेक्षक मनमुराद हसले. अरुणा इराणीने प्रेक्षकांना शिवमसाठी स्थळ सुचविण्याचे आवाहन केले!