
no images were found
शेतकर्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासन निर्णय जाहीर
पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्याने शेतकर्यांना हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासनाच्या आदेशात नमूद केले आहे.