
no images were found
देशात जुलै महिन्यात ६ अब्ज डिजिटल व्यवहार, पंतप्रधानांकडून देशवासियांचे कौतुक
नवी दिल्ली : देशातील अनेक नागरिक डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. अशात जुलै महिन्यात युपीआयच्या माध्यमातून तब्बल ६ अब्ज डिजिटल व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामुळे देशवासियांचे कौतुक केले आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे. यासंबंधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या ट्वीटला पंतप्रधानांनी प्रतिसाद देत “ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. नव तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा आणि अर्थव्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा भारतीय नागरिकांचा संकल्प आहे, याचेच हे संकेत आहेत. विशेषतः कोरोना काळात, डिजिटल व्यवहार अतिशय उपयुक्त ठरले.”, अशी भावना त्यांनी ट्विवटरवरून व्यक्त केली.