Home सामाजिक कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन

कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन

0 second read
0
0
71

no images were found

कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन

कोल्हापूर : कोल्हापुरात १२, १३ सप्टेंबरमध्ये भव्य असे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केल्याची व त्याला पाच जिल्ह्यांतून सराफ व्यावसायिक भेट देतील, अशी माहिती केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी आज हॉटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व स्थानिक संघटनांच्या सहयोगाने प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूर जिल्हा दागिने उत्पादनाचे मोठे केंद्र आहे. एक दागिना साधारण आठ कारागिरांच्या हातून जाऊन तयार होतो. त्या दृष्टीने त्यासाठी आवश्यक मशिनरींचे प्रदर्शन येथे महासैनिक दरबार हॉल येथे १२ व १३ सप्टेंबरला होत आहे. विशेष करून चांदीच्या दागिन्यांसाठी लागणाऱ्या मशिनरीच्या स्टॉलबरोबर स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांचेही निवडक स्टॉल असतील. सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या प्रदर्शनासाठी कोल्हापूरच नाही तर सांगली,  सातारा,  सोलापूर,  रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा येथून सराफ व्यावसायिक उपस्थित राहतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…