
no images were found
‘खासदार चषक’ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस शानदार प्रारंभ,विक्रमी सहभाग
कोल्हापूर(प्रतिनिधी) :- शिवाजी विद्यापीठ मधील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित केलेल्या अखिल भारतीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील नामांकित 355 बुद्धिबळपटू या स्पर्धेत विक्रमी संख्येने सहभागी झाले आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक व युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व बुद्धिबळाच्या पटावर चाल करुन करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारी अनिश गांधी, सौ.व डॉ.दिनेश चव्हाण आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर, उत्कर्ष लोमटे, उमेश पाटील ,आरती मोदी, करण परीट इत्यादी उपस्थित होते.
या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणार आहे. आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर कोल्हापूरचा सम्मेद शेटे, द्वितीय मानांकित कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारी यांच्यासह तृतीय मानांकित अनिश गांधी कोल्हापूर, ध्रुव पाटील सोलापूर, सोहम खासबारदार कोल्हापूर, ओंकार कडव सातारा, विक्रमादित चव्हाण सांगली व श्रीकरा दरभा बेळगाव हे आठ जण पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. सहावा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर, जयसिंगपूरचा अभय भोसले, मिरजेचा मुद्दसर पटेल व , कोल्हापूरचा आयुष महाजन हे चौघेजण साडेचार गुणासह द्वितीय स्थानावर आहेत.