चांदोली धरणातून 3000 क्यूसेक’ने पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शितूर: मागील पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे चांदोली धरणात २८.७८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, दुपारी तीन वाजता वाजता पाटबंधारे विभागाचे विभागाचे उपविभागीय अभियंता किटवडकर, …