
no images were found
तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची : प्रा. साधना झाडबुके
कोल्हापूर– “तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते “ असे मत प्रा. साधना झाडबुके व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित ‘तृतीयपंथीय आणि माध्यमे’ या विषयावरील व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या.
तृतीयपंथीयांची समाजाकडून होणारी अवहेलना, विविध पद्धतीने हिनवणे, चेष्टा करणे, विनयभंग करणे तसेच त्यांना मिळणारी वागणूक, त्यांच्या समस्या याविषयी सामाजिक कार्यकर्त्या संशोधक प्रा. साधना झाडबुके त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या तृतीयपंथीयांसाठीचा 2019 च्या कायद्याची सविस्तर माहिती दिली तसेच माध्यमांनी या कायद्यातील तरतुदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.तृतीयपंथीयांनातृतीयपंथी आहेत म्हणून सार्वजनिक सुविधांपासून वंचित करता येणार नाही तसेच नाकारता येणार नाही असे घडल्यास तो कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा असल्याची माहिती त्यांनी या वेळेला दिली तृतीयपंथीयांना स्त्री-पुरुषांसारखे शासकीय योजनेचे लाभ मिळावेतअशी अपेक्षा यावेळी झाडबुके यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कादंबरी भोसले, सिमरन घाशी या विद्यार्थिनींनी आपले मत मांडले आदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी पाहुण्यांची ओळख आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ सुमेधा साळुंखे, सचिन दिवाण अनुराधा इनामदार आणि विभागाचे विद्यार्थी उपस्थीत होते.